Ram Gopal Varma’s Unique Tribute To Bruce Leela With Indo-Chinese Production Ladki – Enter the Girl Dragon’s Trailer Release

इंडो-चायनीज प्रॉडक्शनच्या लड़की- एन्टर द गर्ल ड्रॅगन’चा ट्रेलर रिलीज ब्रूस लीला राम गोपाल वर्मांची अनोखी आदरांजली

यशस्वी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा इंडो-चायनीज प्रॉडक्शनसह त्यांच्या सर्वात महत्वाकांक्षी आणि त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महागड्या  ‘लड़की: एन्टर द गर्ल ड्रॅगन’ या चित्रपटाने पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहेत.

भारत आणि चीनमध्ये गलवान संघर्ष झाल्यानंतर चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे. ‘लड़की: एन्टर द गर्ल ड्रॅगन’ या मार्शल आर्ट्सवर आधारित सिनेमाने भारत आणि चीनला पुन्हा एकत्र आणल्याचाच हा पुरावा आहे.

RGV आरजीव्ही नावाने ओळखल्या जाणाऱ्या रामगोपाल वर्मा चीनची ग्रेट वॉल पार करणारा पहिला भारतीय निर्माता ठरला आहे. सीमेच्या पलीकडे चीनमध्ये आणि आपला भारतातही तो त्याचा हा नवा चित्रपट ‘लड़की: एन्टर द गर्ल ड्रॅगन’ रिलीज करणार आहे. आज त्यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूबवर चॅनेलवर या सिनेमाचा हिंदी आणि चीनी भाषेत ट्रेलर रिलीज केला. त्यांच्या या ट्रेलरला प्रेक्षक आणि बॉलिवूडमधील सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

“सरकार हा जसा हॉलिवूडच्या सुपरहिट गॉडफादर सिनेमाला माझी श्रद्धांजली होती, तसाच पूजा भालेकर अभिनीत ‘लड़की- एंटर द गर्ल ड्रॅगन’ हा माझा ब्रूस लीला श्रद्धांजली आहे.” असे सिनेमाचा ट्रेलर रिलीज करताना रामगोपाल वर्मा यांनी म्हटले.

मार्शल आर्ट्सवर आधारित या सिनेमाने भारत आणि चीन पुन्हा एकत्र आले आहेत. या दोन्ही देशांमध्ये गलवान संघर्षानंतर चीनमध्ये रिलीज होणारा ‘लड़की- एंटर द गर्ल ड्रॅगन’ हा पहिला भारतीय चित्रपट असेल.

आर्टसी मीडिया आणि चायनीज प्रोडक्शन कंपनी बिग पीपल द्वारे निर्मित,  ‘लड़की- एंटर द गर्ल ड्रॅगन’ हा इंडो चायनीज कंपन्यांची सहनिर्मिती असलेला सिनेमा आहे. याचे शूटिंग मुंबई, गोवा आणि चीनमध्ये झाले आहे.

  

इंडो-चायनीज प्रॉडक्शनच्या लड़की- एन्टर द गर्ल ड्रॅगन’चा ट्रेलर रिलीज


Comments are closed.

comments-bottom